मुंबई - नक्षलवादी आणि भारतीय निमलष्कर दल किंवा पोलीस यांच्यातील संघर्ष नेहमीच बघायला मिळतो. नक्षलवाद्यांच्या हिंसेत अनेक सैनिक आणि पोलिसांना हौतात्म्य आले आहे. आज गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. नजर टाकूया नक्षलवाद्यांनी केलेल्या मागील दहा वर्षातील महत्वाच्या हल्ल्यांवर
छत्तीसगड २००७ - नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या छावणीवर रानी बोडी या गावात हल्ला केला होता. यात ५५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. छत्तीसगड राज्य पोलीस आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश होता.
नयागढ २००८ - नयागढचा नक्षलवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यापैकी मानला जातो. यात १४ पोलिसांना हौतात्म्य आले होते.
गडचिरोली २००९ -२७ मार्चला गडचिरोली येथे भूसुरंग फोडून स्फोट घडवण्यात आला होता. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १५ जवान हुतात्मा झाले होते.