मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली गेली आहे. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ही वाढ केली आहे. नवाब मलिक यांनी किडनी विकार असल्याचा दावा केला होता. त्यासाठी वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांनी अर्ज केला. जामीनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दहशतवादी फंडिंग केला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. कुख्यात आरोपी आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी दाऊदसोबत कथित गैरव्यवहार केला, असा आरोप करण्यात आला आहे.
गैरव्यवहार केल्याचे पुरावे : मलिक रुग्णालयात दाखल असल्यामुळे मलिक यांना न्यायालयात हजेरी लावण्यापासून न्यायालयाने सूट दिली आहे. मात्र जामीनाबाबत अद्यापही कोणताही निर्णय न्यायालयाकडून आलेला नाही. त्याबाबत सरकारी पक्ष अर्थात ईडीने दावा केला आहे की, त्यांच्याबाबत गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देता कामा नये. आता 17 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.