मुंबई-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्रातल्या झंझावाताला घाबरूनच भाजप सरकार त्यांच्या विरोधात ईडीची कारवाई करत आहे. मात्र, या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेस बळी पडणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, हजारो कार्यकर्ते तुरुंगात जायला तयार - नवाब मलिक - राष्ट्रवादी काँग्रेस
शिखर बँकेच्या व्यवहाराशी काहीही संबंध नसताना आकसापोटी ही कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी पवार यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीने गुन्हा दाखल करण्यामागे भाजपचे षढयंत्र असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कधीच नव्हते. त्यांचा या बँकेच्या व्यवहाराशी काहीही संबंध नसताना आकसापोटी ही कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी पवार यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीने गुन्हा दाखल करण्यामागे भाजपचे षढयंत्र असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आरोपपत्रात अजित पवारांचेही नाव आहे. अजित पवार ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना ईडीला सहकार्य करण्याची पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.