मुंबई -केंद्रातील मोदी सरकारकडून जनतेचा आवाज दाबण्यात येत आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केली. विदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच ना? मात्र, तरही किती लोकांना भाजप सरकार अटक करणार? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी केला.
संपूर्ण देश एकत्र -
लोकांचा आवाज दाबण्याचा ही केंद्र सरकारचा भित्रेपणा आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघुया, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरू बनल्याचे जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र, एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपलसरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाही आहेत. तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले.