मुंबई - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काही लोक भीती आणि लालसेपोटी पक्षांतर करत असून जनता त्यांना साथ देणार नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
लालसेपोटी पक्षांतर करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही - नवाब मलिक - काँग्रेस
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक
देशाच्या राजकारणात आता नवीन अध्यायाला सुरुवात झाली असून, तो अध्याय हा 'डर और लोभ' असल्याचे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक नेते इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.