महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवरात्रोत्सव 2021 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त - navratri festival 2021

नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंदिरे आज पासून दर्शनासाठी खुली झाली आहे. मात्र, यंदाही नवत्रोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करुनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

navraatra 2021
navraatra 2021

By

Published : Oct 7, 2021, 7:59 AM IST

Updated : Oct 7, 2021, 10:01 AM IST

हैदराबाद -आदिशक्ती दुर्गेची उपासना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंदिरे आज पासून दर्शनासाठी खुली झाली आहे. मात्र, यंदाही नवत्रोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करुनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्राला विशेष महत्त्व आहे. हा नवरात्र 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान, नऊ दिवस मॉं दुर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जाणार आहे.

असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त -

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला घटस्थापना किंवा कलश स्थापनेला विशेष महत्त्व आहे. प्रतिपदेच्या तिथीला, घटस्थापना शुभ वेळेत पूर्ण विधींसह केली जाते. आज प्रतिपदा तिथी सकाळी 6:17 ते सकाळी 07:08 पर्यंत घटस्थापनेसाठीचा शुभमुहूर्त आहे. तर घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:51 ते दुपारी 12:38 पर्यंत असेल.

  • सूर्योदय- 06:21 AM
  • सूर्यास्त- 06:08 PM
  • तिथि- शुक्ल प्रतिपदा, दुपारी 01:46 पर्यंत
  • योग - वैधृति, उद्या मध्यरात्री 01:40 पर्यंत
  • वार- गुरुवार
  • घटस्थापनेचा पहिला मुहूर्त - 06:21 AM ते 07:08 AM
  • घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त - 11:51 AM ते 12:38 PM

हेही वाचा - कोल्हापुरात आदिशक्तीचा आजपासून जागर; श्री अंबाबाईसह ज्योतिबा मंदिर सज्ज

Last Updated : Oct 7, 2021, 10:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details