मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरूवात, देवी मातेचे उत्साहात आगमन - नवरात्रोत्सव
डीपी वाडीची माऊली, सांताक्रूझची दुर्गा, धारावी सुभाषनगरची आई, कोळीवाडा येथील रेणुका देवी तसेच फोर्ट, अंधेरी, कुर्ला या परिसरातील नवरात्रौत्सव मंडळातील देवींचे आगमन झाले आहे.
मुंबईत देवी मातेचे उत्साहात आगमन
मुंबई- नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात देवीची कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करण्यात आली. शहरात देवीचे मोठ्या उत्साहात ढोलताशा,डीजे वाजत आगमन झाले. शहरात देवी बसतात त्याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आहे. पुढचे नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.