मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांत जागतिक कच्च्या तेलाचे उत्पादन घटले. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडत होता.
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरुद्ध मोर्चा हेही वाचा -‘चांगला रस्ता शोधून दाखवा’ स्पर्धेचे आयोजन करा; आव्हाड यांचा शिवसेनेला टोला
सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 84.70 रुपये आहे. मुंबईत हा दर दिल्लीपेक्षा 7 रुपये अधिक आहे आणि ग्राहकांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 91.32 रुपये द्यावे लागत आहेत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या व गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भीषण महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे हातगाडी मोर्चाचे कांदीवलीत आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत आणि दुचाकीला हातगाडीवर ठेऊन पेट्रोल पंपावर नेले. मोर्चाचे आयोजन अल्पसंख्याक विभाग मुंबई उत्तर जिल्हा अध्यक्ष जमालुद्दीन शेख यांनी केले. या वेळी, अॅड. इंद्रपाल सिंह, कार्याध्यक्ष फाहेमीदा हसन खान व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -औरंगाबाद नामांतर : 5 वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत - बाळासाहेब थोरात