महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची अचानक मंत्रालयावर धडक; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी - बेरोजगारी

सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. या फसव्या आश्वासनांचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई

By

Published : Jul 31, 2019, 7:26 PM IST

मुंबई- बेरोजगारीच्याविरोधात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज मंत्रालयावर अचानक धडक देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी युवकने अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची अचानक मंत्रालयावर धडक

सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. या फसव्या आश्वासनांचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

राज्यातील तरुण वर्ग हवालदिल झाला असताना मुख्यमंत्री निवडणूक प्रचाराच्या यात्रा काढण्यात व्यस्त आहेत. म्हणून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करत थेट मंत्रालयात धडक दिली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आणि युवकचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details