मुंबई -कोकणातील नाणारमध्ये रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली होती. मात्र आम्ही हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात कुठेही होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. सरकारने हा रिफायनरी प्रकल्प कोकणातून बाहेर नेण्याचे आश्वासन दिले आणि पुन्हा ते कोकणावर लादत असल्याने आम्ही पुन्हा याला विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नाणारमधील रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प रायगडातही होऊ देणार नाही - अशोक वालम - ratnagiri
कोकणातील रिफायनरी प्रकल्प हा रोहाजवळ केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी हा रिफायनरी प्रकल्प रोहा येथे उभारला जाईल, तशी तयारी स्थानिकांनी दाखवली आहे, असे अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदन केले.
कोकणातील रिफायनरी प्रकल्प हा रोहाजवळ केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी हा रिफायनरी प्रकल्प रोहा येथे उभारला जाईल, तशी तयारी स्थानिकांनी दाखवली आहे, असे अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदन केले. त्यासाठी त्यांनी स्थानिकांच्या मतांचा विचार केला नाही. यामुळे या रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. कोकणात रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असे म्हणणारे मुख्यमंत्री पुन्हा कोकणातच रिफायनरी प्रकल्प का आणू पाहत आहेत. स्थानिक नागरिकांची मर्जी नसताना प्रकल्प कोणाला मंजूर आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने सवाल केला आहे. तर कोकणाची राख तर गुजरातची रांगोळी होऊ देणार नाही, असे त्यावेळी मोठ्या आवेशाने बोलणाऱ्या शिवसेनेने आपले आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वालम यांनी केली आहे.
नाणारचा रिफायनरी प्रकल्प हा रोहा येथे आला तर येथील अनेक कोळीवाडे, अनेक गावे उध्वस्त होणार आहेत. पारंपरिक व्यवसाय नष्ट होणार आहेत. त्यात रोहा -खोपे, सारसोली, तळवडे, खैराळे, खारखर्डी, महाळुंगे, नवखार, दीव, दापोली, धोडखार, धोंडखार उमटे, शेडसई, न्हावे, शिळोशी, सोनखार, कोकबन, खुटल, चांगगाव, कजरविरा, आंबिवली, धगडवाडी आदी गावे प्रभावित होणार असून त्यासोबतच अलिबाग–भोनंग, रामराज, सुडकोली, कुंदे, ताजपूर, मालाडे, नवखार, तळवली’मुरूड – तळे, तळेखार, सावरोली, चोरढे, वळके, सातीर्डे, शिरगाव, येसदे, तडगाव, आमली आणि श्रीवर्धन- वारळ या गावांचे अस्तित्व नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.