मुंबई-केंद्रातील भाजपाच्या सत्तेला दूर करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या तयारीसंदर्भात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी राज्यातील येड्यांच्या सरकारचा समन्वय नसल्याने जनता त्रस्त असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
असे असणार इंडिया बैठकीचे नियोजन-मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. भाजपा विरोधातील देशातील 26 पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहे. आयोजनाची मुख्य जबाबदारी ठाकरे यांच्याकडे आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांची स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून 31 ऑगस्टला डिनर तर 1 सप्टेंबरला काँग्रेसकडून नेत्यांना लंच दिले जाणार आहे.
ज्याची त्याची जबाबदारी ठरली -काँग्रेस प्रदेशाध्यक्षनाना पटोले म्हणाले की, बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आणि आम्ही सर्व उपस्थित होतो. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपापल्या जबाबदारीसंदर्भात चर्चा केली. संपूर्ण देशांमधून सात राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांचे स्वागत योग्य प्रकारे करता येईल, याची काळजी घ्यावी लागेल.