पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक मुंबई :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करत घोषणाबाजी केली. माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमले होते. त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले.
शिवसेनेकडून (यूबीटी) केवळ राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आंदोलनावेळी उपस्थित होते. 'सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली', अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. '५० खोके एकदम ओके' अशी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. 'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो' अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले. या आंदोलनात शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता.
चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासह विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकला आहे.
अनेक घटनात्मक निकषांची अवहेलना :संवैधानिक नियमांवरील या सरकारची वैधता आधीच प्रश्नार्थक आहे, असे ते म्हणाले. दानवे यांनी आरोप केला की, सरकार विरोधी पक्षांवर दबाव आणत आहे. त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत आहे. यासाठी तपास यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचे धोरण आखले आहे. या सरकारने अनेक घटनात्मक निकषांची अवहेलना केल्यामुळे आपण महाराष्ट्रात लोकशाहीचे गंभीर चित्र पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अपात्रतेला सामोरे जात आहेत, असे दानवे म्हणाले.
हेही वाचा :
- Maharashtra Assembly 2023 Update : पेरणी न झाल्यास आपतकालीन प्लॅन, बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार-देवेंद्र फडणवीस
- Maharashtra Monsoon Session 2023 : शरद पवार गटातील नेत्यांना अजित दादांसोबत बसायाचं नाही; जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
- Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता, 'या' मुद्द्यांसह महत्त्वाच्या विधेयकांवर होणार चर्चा