महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा' - मुंबई

आज मुंबई व ठाण्यातील काही भागांत छापा टाकून तब्बल 15 कोटी रुपयांचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांना शोध सुरू आहे. यातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

आमदार अँड. आशिष शेलार
आमदार अँड. आशिष शेलार

By

Published : Mar 24, 2020, 2:47 PM IST

मुंबई - मास्कचा बेकायदेशीर साठा करून काळाबाजार केल्याप्रकरणी वांद्रे येथे सापडलेल्या दोषींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

बोलताना आशिष शेलार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही जणांकडून मास्कचा काळाबाजार सुरू आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर वांद्रे परिसरात आज कारवाई करण्यात आली.

या कारवाईत जवळपास 15 ते 20 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी वांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईबद्दल आमदार आशिष शेलार यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच या प्रकारणी दोषी असणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा -कलम 144 : वाशी टोल नाक्यावर पोलिसांकडून कडक अंमलबजावणी

ABOUT THE AUTHOR

...view details