महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत - 'नेशन फर्स्ट आणि नेशन सुप्रीम'

'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा 'हिंदू' आहे. भारतात मुस्लिमांना कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही', असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते 'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या कार्यक्रमात बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत

By

Published : Sep 7, 2021, 7:59 AM IST

Updated : Sep 7, 2021, 8:38 AM IST

मुंबई : 'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा 'हिंदू' आहे', असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या 'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या कार्यक्रमात बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत

मुस्लिमांनी कशाचीही भीती बाळगू नये - भागवत

''समंजस' मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण हिंदू कोणाशीही वैर करत नाहीत', असेही मोहम भागवत म्हणाले.

भारताच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे - भागवत

"हिंदू हा शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. हा इतर विचारांचा अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाबद्दल नाही तर भारतीय वर्चस्वाबद्दल विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे", असेही मोहन भागवत म्हणाले.

मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांना विरोध केला पाहिजे - भागवत

"इस्लाम आक्रमकांसह भारतात आला. हा इतिहास आहे आणि त्याच प्रकारे सांगितला पाहिजे. सुज्ञ मुस्लिम नेत्यांनी अनावश्यक मुद्द्यांना विरोध केला पाहिजे. अतिरेकी आणि अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. जितक्या लवकर आपण हे करू, तितके समाजाचे कमी नुकसान होईल", असे आवाहन भागवत यांनी केले.

'भारत कोणालाही धमकावणार नाही'

"महासत्ता म्हणून भारत कोणालाही धमकावणार नाही. हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा समानार्थी आहे. या संदर्भात प्रत्येक भारतीय आपल्यासाठी हिंदू आहे. मग तो त्याच्या धार्मिक, भाषिक आणि वांशिक असो. हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. भारतीय संस्कृती विविध विचारांना सामावून घेते आणि इतर धर्मांचा आदर करते", असे मोहन भागवत 'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या परिसंवादात म्हणाले.

या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे कुलपती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनीही उपस्थिती लावली. खान म्हणाले, की 'अधिक विविधता समृद्ध समाजाकडे जाते. भारतीय संस्कृती प्रत्येकाला समानतेने वागवते'.

तर, हसनैन म्हणाले, की 'मुस्लिम विचारवंतांनी भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे'.

यापूर्वी मॉब लिंचिंगच्या घटनांमधून हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे मोठे कारस्थान सुरु असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला होता. 'भारत हे एक हिंदू राष्ट्र असून ही गोष्ट कधीच बदलू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी याआधी केले होते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहलेलं ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारताला आपली मातृभूमी माननारा आणि तिच्यावर प्रेम करणारा व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत हिंदू जिवंत आहे. देशाच्या बाहेरून येणाऱया लोकांनाही आम्ही आपले मानले आहे. आपण सर्व विचारधारा बदलू शकतो. मात्र 'भारत हे एक हिंदू राष्ट्र' आहे. ही गोष्ट बदलू शकत नाही, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा -मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ टळली, पालिकेचे ५०० कोटीचे नुकसान

Last Updated : Sep 7, 2021, 8:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details