मुंबई- पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीच्या वादात अडकलेला महालक्ष्मी पूलाचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी येथे केबल दोरखंडाचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर पालिका 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिका आणि रेल्वे आपल्या हद्दीतील पूलाचे बांधकाम करणार आहे.
महालक्ष्मी उड्डाणपूल शंभर वर्षांपूर्वी जूना आहे. तो जीर्ण झाल्यामुळे धोकादायक बनला आहे. या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याची गरज आहे. मात्र, रेल्वे आणि पालिकेच्या हद्दीमुळे निर्णय घेतला जात नव्हता. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका संयुक्त बैठकीतून या पूलाच्या अडचणी दूर केल्या होत्या. आता रेल्वे आणि पालिका यांच्या समन्वयातून पूलाचे बांधकाम केले जाणार आहे.