ठाणे:ओमायक्राॅन आणि कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे देशासह महाराष्ट्रात चिंता वाढत आहे. कोरोना संक्रमितांची संख्या दरदिवशी कित्येक पटींनी वाढत अआहे. ठाण्यात ही संख्या 700 च्या पुढे गेली आहे. ठाण्यातील सर्वच बड्या नेत्यांना कोरोनाने ग्रासले असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ विपीन शर्मा हे कोरोना पॉजिटीव्ह झाल्यानंतर आता पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे हे तीनही बडे नेते सध्या होम क्वारंटाईन असून त्यांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याने या लसीच्या विश्वासाहारते बद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
तीन बडे नेते क्वारंटाईन
देशात कोरोना ओसरत असतानाच विदेशातून दाखल झालेल्या 'ओमायक्रॉन' या नविन विषाणुमुळे धास्ती वाढली आहे. आता ठाण्यात कोरोनाची तिसरी लाट उसळली असून, नागरिकांसह राजकीय मंडळीनाही कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे. ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिवसेनेचे हे तीनही बडे नेते सध्या होम क्वारंटाईन असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आता या नेतेमंडळींच्या संपर्कात आलेल्या अनेकांना धास्ती वाटु लागली असून, सर्वजण कोविड टेस्ट करून घेत आहेत.