मुंबई -महापालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळांंमध्ये चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे मानसशास्त्रीयदृष्ट्या संयुक्तिक होणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र आंबोरे यांच्या ठरावाच्या सूचनेद्वारा केलेल्या मागणीवर अभिप्राय देताना पालिकेने हे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना लहानपणापासूनच मातृभाषेसह इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषा आत्मसात करण्याचे वर्ग सुरु करावेत, अशी मागणी नगरसेवक भालचंद्र आंबोरे यांनी २०१५ साली ठरावाच्या सूचनेद्वारा केली होती. या मागणीवर प्रशासनाने अभिप्राय देऊन तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार मुलांवर नको, असे स्पष्ट केले आहे.