महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 26, 2021, 3:20 PM IST

Updated : May 26, 2021, 5:01 PM IST

ETV Bharat / state

मुंबईकरांना लोकल प्रवासाची करावी लागेल आणखी प्रतीक्षा

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता मुंबईची उपनगरीय लोकल सेवा बंद केली होती. त्यानंतर 15 जून 2021पासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दार तब्बल 10 महिन्यापासून बंदच होते.

mumbai local
मुंबई लोकल

मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा 1 जून 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र, आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी जोरधरत आहे. मात्र, राज्य सरकारने लोकलची गर्दी लक्षात घेता आणखी पुढील पंधरा दिवस सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

अवघ्या अडीच महिन्यात लोकलचे दार बंद -

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता मुंबईची उपनगरीय लोकल सेवा बंद केली होती. त्यानंतर 15 जून 2021पासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दार तब्बल 10 महिन्यापासून बंदच होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्य सरकारकडून 1 फेब्रुवारी 2021पासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली होती. मात्र, मुंबईसह राज्यात अवघ्या अडीच महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे 22 एप्रिल 2021पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार पुन्हा एकदा बंद करण्यात आले. आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांनामधून लोकल प्रवासात मुभा देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा -उजनीच्या पाण्याचा वाद शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात

लोकल संदर्भात काय म्हणाले मंत्री?

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना माध्यमांनी लोकल सबंधित प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबईचे लोकलचे दरवाजे अजून पुढील पंधरा दिवसांसाठी उघडले जाणार नाही. लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ शकतो. म्हणून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू ठेवणार आहे. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, जेव्हापर्यत मुंबईतील नागरिकांचे 50 टक्के लसीकरण होत नाही तेव्हापर्यत लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही.
दररोज 38 लाख प्रवासी प्रवास करतात -

लॉकडाऊन पूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, आता कोरोनाचा पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर 22 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 16 लाख प्रवासी प्रवास करत आहे. विशेष म्हणजे प्रवासी संख्या घटली असली तरी उपनगरीय लोकल सेवा 95 टक्के क्षमतेने सुरू आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालयाचे वेळ एकच असल्याने सकाळी आणि सायंकाळी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वेची डोके दुःखी वाढली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनेकडून खासगी आणि शासकीय कार्यालयाचे वेळेत बदल करण्याची मागणी करत आहे.

95 क्षमतेने धावतात लोकल -

सध्या उपनगरीय लोकल सेवा 95टक्के क्षमतेने सुरू आहे. दररोज मध्य रेल्वे मार्गावर 1 हजार 685 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 1 हजार 300 लोकल फेऱ्या धावत आहे. तर 12 डब्याच्या लोकलमधून 1 हजार 200 प्रवासी क्षमता आहे. तसेच 700 प्रवासी प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते. रेल्वे प्रवासात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी "येथे बसू नका" असे पत्रक सुद्धा आसनावर लावण्यात आले होते. मात्र, प्रवासी या नियमांची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे लोकल प्रवासात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -अंगावर येणारा समुद्र, लाटांच्या उंच भिंती... तौक्तेचे भयाण रुप व्हिडिओत कैद, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्ये

Last Updated : May 26, 2021, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details