मुंबई - शहरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहे. यामुळे तब्बल १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असून वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहे.
रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईतील तब्बल १३ लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल
मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले असून मुंबई पाणीमय झाली आहे. पावसाचे पाणी रेल्वे रूळावर साचल्याने काही गाड्या रद्द करण्यात आले असून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे ३० कि.मी. प्रतितास या गतीन चालविली जात आहे.
छाया - सौ. एएनआय
रूळावरील पाणी कमी झाल्यानंतर पालघरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे 30 किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावत आहेत, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
अंधेरी, कुर्ला, बांद्रा, सांताक्रुझ, बीकेसी आणि इतर ठिकाणी रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सायन रेल्वे स्थानक ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यानचे रेल्वे रूळ मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.