महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

New Year Celebrations of Mumbaikars : थर्टी फर्स्टसाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज; शहरातील 'या' मार्गांमध्ये केले बदल - शहरातील या मार्गांमध्ये केले बदल

थर्टी फर्स्टच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी ( Mumbai Traffic Police is Ready For Thirty First ) मुंबईच्या रस्त्यावर मुंबईकर हजारोंच्या संख्येने ( Changes have been Made to These Routes in City ) उतरतात. त्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होते. वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने नियोजन केले आहे.

Mumbai Traffic Police is Ready For Thirty First So Changes have been Made to These Routes in City
थर्टी फर्स्टसाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज; शहरातील 'या' मार्गांमध्ये केले बदल

By

Published : Dec 28, 2022, 10:17 PM IST

मुंबई :नागरिकांकडून थर्टी फर्स्टला सेलिब्रेशन करून नव्या वर्षाचे जंगी ( Mumbai Traffic Police is Ready For Thirty First ) स्वागत केले जाते. या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवरच पोलीस यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाले आहे. मुंबईशहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरत्या वर्षांला निरोप देताना ( Changes have been Made to These Routes in City ) आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जय्यत तयारी करीत आहेत. या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरतात. मुंबईच्या सीफेसवर नागरिकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते. त्यात यंदा प्रथमच नववर्षांच्या पहाटेच्या पाचपर्यंत मद्यविक्री दुकानांनाही परवानगी मिळाल्याने तळीरामांमध्ये उत्साह दुणावल्याचे चित्र आहे. यामुळे यंत्रणा कामाला लागली असून मद्यपींना दारू पिण्यासाठी परवाना दाखवावा लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय वरळी सीफेस समुद्र किनारीनववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय आपआपल्या वाहनांसह वरळी वाहतूक विभागांंतर्गत वरळी सीफेस समुद्र किनारी एकत्र येतो. येणारे नागरिक हे आपली वाहने खान अब्दुल गफार खान मार्गावरील मेला जंक्शन ते जे. के. कपूर चौकदरम्यान उभी करतात. त्यामुळे वाहतूककोंडीची शक्यता निर्माण होणार आहे. त्यामुळे हा परिसर थर्टी फर्स्ट दिवशी तात्पुरत्या स्वरुपात 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

'नो पार्किग झोन' खान अब्दुल गफार खान जंक्शन ( मेला जंक्शन) ते जे. के. कपूर चौकदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना उत्तरवाहिनी व दक्षिणवाहिनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या सकाळी ६.०० वा. पर्यंत वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन असेल.

मुंबईतील हे मार्ग राहणार बंदमरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी आवश्यकता लागली तर बंद असेल. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details