महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Terror Attack : कसाबच्या हल्ल्यातून 'हे' नसते तर आम्ही बचावलो नसतो; कसाबला पकडण्याचा थरार

मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण होत ( Mumbai terror attack ) आहेत. हल्ल्याच्यावेळी पोलिसांना दहशतवादी अजमल कसाब ( Terrorist Ajmal Kasab ) याला पकडण्यात यश आलं होतं. या हल्ल्यात निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी महत्वाची भूमिका बजावली, कसाबला पकडण्याचा थरार जाणून घ्या त्यांच्याकडून.

कसाबला पकडण्याचा थरार
Mumbai Terror Attack

By

Published : Nov 25, 2022, 10:20 PM IST

Updated : Nov 28, 2022, 9:49 AM IST

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी पोलिसांनी दहशतवादी अजमल कसाब ( Terrorist Ajmal Kasab ) याला पकडण्यात यश आलं. यंदा मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण होत ( Mumbai terror attack ) आहेत. या हल्ल्यात निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी महत्वाची भूमिका बजावली, कसाबला पकडण्याचा थरार जाणून घ्या त्यांच्याकडूनच..

१६६ नागरिकांची हत्या -२६ नोव्हेंबर २००८ ला १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. १६६ निष्पाप नागरिक सुरक्षा रक्षकांची हत्या या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली होती. १४ वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि जखमा अजून ताज्या आहेत. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब या देशद्रोही कसाबला जिवंत पकडून देताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे शहिद झाले. मात्र, गिरगाव चौपाटीवर शहिद ओंबळे यांच्यासह संजय गोविलकर, भास्कर कदम, हेमंत बावधनकरसह १६ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कसाबला जिवंत पकडून देण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.

कसाबला पकडण्याचा थरार
कसाबची स्कोडा गाडी थांबली अन् : रात्री १२.३० वाजता नियंत्रण कक्षाच्या मिळालेल्या संदेशानुसार एक स्कोडा गाडी त्याठिकाणी आली. ज्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी करत होतो. त्याठिकाणापासून ५० फुटावर कसाबची स्कोडा गाडी थांबली. आम्ही गाडीचे हेडलाईट बंद करायला सांगितले. परंतू दहशदवाद्यांनी लाईट आणखीनच तीव्र केले. वायपरवर विंड स्क्रीवर वॉटर शॉवर सुरु केले. नंतर वेगाने गाडी आमच्या दिशेने आली. ती गाडी युटर्न घेण्याच्या तयारीत असताना रोड डिव्हायडरवर धडकली. मी आणि माझे सहकारी भास्कर कदम ड्रायव्हरच्या दिशेने त्यांना ताब्यात घ्यायला गेलो. तेव्हा त्या गाडीचा चालक अतिरेकी होता.

तुकाराम ओंबळेमुळेच आम्हाला जीवनदान-अबू इस्माईल याने आमच्यादिशेने गोळीबार केला. त्यावेळी आमचे सहकारी भास्कर कदम यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्या अतिरेक्याला प्रत्युत्तर देत गोळीबार करून अबू इस्माईलला जखमी केले. कसाब गाडीत डाव्याबाजूला बसलेला होता. कसाब दरवाजा उघडून बाहेर आला. त्याचवेळेला त्याला घेराव घालायला आमचे सहकारी संजय गोविलकर, तुकाराम ओंबळे जात होते. तेव्हा कसाबने एके ४७ मधून गोळीबार केला. त्यात तुकाराम ओंबळे गंभीर जखमी झाले. ओंबळे यांनी आमचे प्राण वाचवून स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या.

तुकाराम ओंबळे शहिद -दुर्दैवाने उपचारादरम्यान तुकाराम ओंबळे शहिद झाले. तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाही तर चित्र काही वेगळेच असले असते. सर्व गोळीबार स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी आम्हाला जीवनदान दिले, असा थरकाप उडवणारा चित्तथरारक अनुभव हेमंत बावधनकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला.

Last Updated : Nov 28, 2022, 9:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details