मुंबई :अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर एनसीबीकडून 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दोन वर्षापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मागणी केली होती की, एकूण आरोपींपैकी आठ आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासणी करायला हवे. त्यांची ही मागणी मुंबईतील विशेष न्यायालयाने मान्य केली आहे. आता संदर्भातील आठ आरोपींचे आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत.
Sushant Singh Rajput Case आरोप पत्रामध्ये 33 जण : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्स संदर्भात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी पुरावांच्या आधारे एनसीबीने आरोप पत्र न्यायालयात दाखले केले होते. या आरोप पत्रामध्ये एकूण 33 जणांचा समावेश आहे. त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मीरांडा दीपेश सावंत यांच्यासह 33 जणाचा आरोपी म्हणुन समावेश आहे.
नमुने तपासण्याची मागणी : दोन वर्षापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून एकूण आरोपीमध्ये आठ आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासणी करण्याची मागणी केली होती. त्याची ही मागणी आज न्यायालयाने मान्य केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून दोन वर्षांपूर्वी 33 जणांपैकी आठ जणांचा आरोपीमध्ये समावेश होता. त्यानी 33 जणांपैकी आठ जणांच्या आवाजाचे नमुने घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. प्रकरणाच्या अनुषंगाने त्यातील आवाज कोणाचे आहे याची तपासणी करायची होती. त्यामुळे आवाजाच्या नमुन्यामुळे नेमका आवाज कुणाचा होता. त्यांच्यात नेमके काय संभाषण झाले होते याची महिती मिळणार होती. त्यातून तपासाला वेगळी दिशा मिळली असती असे एनसीबीने म्हटले आहे.
विशेष न्यायालयाची अनुमती :सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणांमध्ये एकूण 33 आरोपी आहेत. या 33 आरोपींपैकी मनोरंजन क्षेत्रामधील माजी कार्यकारी निर्माते क्षितिज प्रसाद ,करण जोहर, धर्म प्रोडक्शन संबंधित चिंता, अनुज केशवाणी संकेत पटेल जिनेन्द्र जैन अब्बास लखानी जैदविलात्रा क्रिस्परेरा, करंजीत सिंग यांचा समावेश आहे. यापैकी आठ आरोपींचे आवाजाचे नमुने तपासणे जरुरी असल्याचे एनसीबीचे म्हणने आहे. त्याच्या या मागणीला मुंबईतील विशेष न्यायालयाने अनुमती दिली आहे.
एनसीबीच्या मागणीला विरोध : या सर्व आरोपींपैकी काही आरोपीच्या वकिलांनी एनसीबीच्या याचीकेला विरोध केला होता. केशवानी यांच्या वकिलांनी 2021 मध्ये न्यायालयात मागणी केली होती की या प्रकणात कोणाचाही समावेश नाही, त्यामुळे एनसीबीने केलेली मागणी फेटाळावी असे त्यांचे म्हणणे होते.' सर्वोच्य न्यायालयाचा संदर्भ देत वकिलांनी एनसीबीची मागणी फेटाळून लावली होती. मात्र, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नुमती देत आता तपास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासावे असे आदेश आज दिले आहेत.
30 आरोपींना अटक :अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी 2020 ते 21 च्या एका वर्षाच्या काळामध्ये अभिनेत्री या चक्रवर्ती आणि तिच्यासह 30 आरोपींना अटक देखील केली होती. या सर्वांना अटक देखील केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर आरोप ठेवला होता. त्यानंतर आरोपींनी डिस्चार्ज मिळावा या संदर्भात विशेष न्यायालयात धाव देखील घेतली आहे. मात्र, अद्याप त्यावरची सुनावणी पूर्ण झालेली नाही. येत्या काळात ती सुनावणी होईल तेव्हा प्रत्यक्षात सर्व माहिती समोर येईल.
हेही वाचा -Mumbai News: सर्वोच्च न्यायालय सुनावणी करेल तेव्हा सत्याचा विजय होईल - संजय राऊत