महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम; मंगळवारी काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष

आता राज्यपालांनी तिसरा सर्वात जास्त बहुमत मिळालेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताची वेळ देण्यात आली आहे. मंगळवारी नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम

By

Published : Nov 11, 2019, 8:13 AM IST

Updated : Nov 11, 2019, 10:46 PM IST

मुंबई - भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली होती. त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, दोन्ही पक्षांनी अद्याप कुठलाही निर्यण घेतलेला नाही. तसेच शिवसेनेचे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना अधिक वेळ मागितला. मात्र, राज्यपालांना वेळ वाढवून देण्यास नकार दिला. मात्र, शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा अद्यापही कायम आहे. त्यातच आता राज्यपालांनी तिसरा सर्वात जास्त बहुमत मिळालेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताची वेळ देण्यात आली आहे. मंगळवारी नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दिवसभरातील राजकीय घडामोडी -

  • 10.21 PM - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील राज्यातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक होणार आहे.
  • 10.19 PM - राज्यपाल भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला
  • 9.36 PM - राष्ट्रवादीची राज्यपालांसोबत चर्चा सुरू, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंतची मुदत
    राष्ट्रवादीची राज्यपालांसोबत चर्चा सुरू
  • 9.27 PM - भाजपने राज्यातील राजकीय घडामोडींबाबत 'वेट अँण्ड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
  • 9.03 PM - राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर दाखल
  • 8.53 PM - आम्ही स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करू. राज्यपालांनी सत्ता स्थापनेची विचारणा केली असल्याची नवाब मलिकांची माहिती
  • 841 PM - राष्ट्रवादीचे अजित पवारांसह अनेक नेते राजभवनांकडे रवाना
  • 8.40 PM - राज्यापालांनी राष्ट्रवादीला बोलावले
  • 7.41 PM - सेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार
  • 7.35 PM - राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंब्याबाबत अद्याप कुठलाही निर्यण नाही.
  • 7.29 PM - काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय नाही
    काँग्रेसचे पत्र
  • 7.00 PM - काँग्रेसकडून शिवसेनेला समर्थनाचे पत्र नाही?, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीची माहिती
  • 6.57 PM - शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते यांच्या ठाण्यातील घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवला.
  • 6.32 PM - आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राहुल शेवाळे राजभवनात दाखल
  • 6.25 PM - शिवसेनेला काँग्रेसचा बाहेरून, तर राष्ट्रवादीचा थेट पाठिंबा दिला असून त्यासंबंधित पत्र राजभवनात फॅक्स केल्याची शक्यता.
  • 5.46 PM - आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना
  • 5.30 PM - सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडे फक्त २ तास उरलेले आहेत.
  • 5.18 PM - सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा
  • 5.15 PM - सोनिया गांधींनी आमदारांशी फोनवरून चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.
  • 5.09 PM - आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सेनेचे नेते राज्यपालांना भेटण्याची शक्यता
  • 5.08 PM - भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी भाजपचे प्रमुख नेते वर्षा बंगल्यावर दाखल
  • 4.36 PM - सोनिया गांधींची महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू झाली आहे.
  • 4.05 PM - काँग्रेस नेते ए. के. अँटनी आणि अहमद पटेल सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याचवेळात महाराष्ट्रातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
  • 3.38 PM - शिवसेनेचे संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करणार आहे. पुढील ३ दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला.
  • 3.15 PM - शरद पवार यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले
  • 3.04 PM - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हॉटेल ताज लँड येथून रवाना
  • 2.45 PM - शरद पवार पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे दाखल,
  • 2.40 PM - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले 7 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात
  • 2.30 PM - शिवसेना नेते अनिल देसाई, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांची दिल्लीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या सोबत बैठक सुरू
  • 2.15 PM - तब्बल 45 मिनिटे चालली पवार-ठाकरे बैठक
  • 2.10 PM - भाजप कोअर कमिटीची बैठक संपली...भाजप 5 वाजता जाहीर करणार भुमिका - सुधीर मुनगंटीवार
  • 2.00 PM - उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमधली बैठक संपली, तपशील मात्र गुलदस्त्यातच
  • 01.34 PM - भाजपने विश्वासार्हतेला तडा दिला... उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला... विश्वास नाही म्हणून राजीनामा दिला... ठाकरे परिवार एक वेळा दिलेला शब्द मोडत नाही
  • 01.32 PM - अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद सुरू,
  • 01.27 PM - शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दीड वाजता दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेणार
  • 01.10 PM - उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू, सोबत आदित्य ठाकरेही उपस्थित, बांद्रा येथील ताज लँड येथे बैठक
  • 12.57 PM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले; शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता
  • 12.36 PM - संजय राऊत दिल्लीला जाणार
  • 12.33PM - सेनेकडून फोन सुरू आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका एकच असेल, दुपारी 4 वाजता पुन्हा होणार राष्ट्रवादीची बैठक, पर्यायी सरकार देणे आमचे कर्तव्य, बैठकानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार
  • 12.31 PM - पर्यायी सरकार बनविण्यासाठी कवायत सुरू, 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही, काँग्रेसचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच भूमिका जाहीर करू
  • 12.29 PM - जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचा निर्णय जाहीर होणार नाही - नवाब मलिक
  • 12.27 PM - राष्ट्रवादीची पत्रकार परिषद सुरू,
  • 12.25 PM - राष्ट्रवादीची बैठक संपली
  • 12.20 PM - महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलवणार - मल्लिकार्जुन खर्गे; पुन्हा दुपारी ४ वाजता बैठक होणार, त्यानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचीही दिली माहिती
  • 12.13 PM - काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीतील बैठक संपली, सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
  • 11.49 AM - राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार, थोड्याच वेळात बैठक संपणार
  • 11.41 AM - संजय राऊत मातोश्रीवरून बाहेर; दिल्लीत जाणार?
  • 11.37 AM - भाजपची भूमिका वेट अँड वाचची भूमिका - सुधीर मुनगंटीवार; संध्याकाळी 7.३० वाजेनंतर भूमिका स्पष्ट करू... बैठकीआधी दिली प्रतिक्रिया...
  • 11.35 AM - भाजप कोअर कमिटीची बैठक - चंद्रकांत पाटील, आशिष शेलार वर्षावर दाखल; 12 वाजता होणार बैठकीला सुरूवात
  • 11.22 AM - 'शिवसेनेने एनडीए सोडला, तुम्हाला काय म्हणायचं?' असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, 'वो ही जाने भाई इसमे हमको क्या मतलब है?'
  • 11.11 AM - काँग्रेसचे आमदार आज 4 वाजता मुंबईत येणार, मागील 3 दिवसांपासून पक्षाने ठेवले आहे जयपुरात
  • 11.09 AM - भाजप कोअर कमिटीची बैठक - केंद्राचे नेते भूपेंद्र यादव मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल
  • 11.05 AM - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांचा विरोधकांना टोला, म्हणाले...
  • 11.00 AM - खासदार अरविंद सावंत यांच्या पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात होणार सुरूवात
  • 11.00 AM - संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले
  • 10.45 AM - काँग्रेस शिवसेनेसोबत भविष्यातील निवडणूका लढवणार का ? सत्तास्थापनेवरून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा सवाल
  • 10.43 AM - संजय राऊत मातोश्रीकडे रवाना
  • 10.25 AM - शिवसेनेचे स्वागतार्ह पाऊल - काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई
  • 10.13 AM - शरद पवार वायबी चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी दाखल
  • 10.10 AM - दिल्लीत काँग्रेसची बैठक सुरू, सोनिया गांधींसह मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल आदी उपस्थित
  • 10.05 AM - प्रफुल्ल पटेल वायबी चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी दाखल... सत्तास्थापनेबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ... आमची कोणीशीही अधिकृत चर्चा नाही... सत्तास्थापनेबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही... बैठकीनंतर पाठिंब्या संदर्भातील निर्णय घेऊ... बैठकी आधी माध्यमांना दिली प्रतिक्रिया
  • 10.04 AM - सुप्रिया सुळे वायबी चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी पोहोचल्या.
  • 09.52 AM - संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे - भारतीय जनता पक्षाचे निवेदन चुकीचे... राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार... भाजपने सत्तास्थापनेबाबत शिवसेनेवर खापर फोडू नये... सरकार बनवणे आमचे कर्तेव्य... राष्ट्रपती राजवट भाजपचा डाव... सत्तास्थापनेसाठी अधिक थोडा वेळ मिळाला असता तर बरे झाले असते... काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तास्थापनेबाबत योग्य निर्णय व्हावा... सत्तास्थापनेसाठी जास्त वेळ मिळायला हवा होता... काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीत प्रेमाचा संवाद सुरू
  • 09.50 AM - शरद पवार बैठकीसाठी रवाना, काँग्रेस-राष्ट्रवादी निवडणूकी आधीपासून सोबत, सत्तास्थापनेबाबत जो काही निर्णय घेऊ तो सोबत घेऊ - पवारांची बैठकीला रवाना होण्यापूर्वी प्रतिक्रिया
  • 09.44 AM - संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद सुरू.
  • 09.40 AM - खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी रवाना
  • 08.30 AM - पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते संजय राऊत घेणार शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट
  • 08.10 AM - दुपारी 12 वाजता भाजपची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक
  • 08.10 AM - सकाळी 10 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार, राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा होणार, बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि अन्य पक्षाचे नेते उपस्थित असतील. रोहित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता...
  • 08.00 AM - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद
  • 07.48 AM - आम्ही हाय कमांडच्या सूचनेनुसार पुढे जाऊ - मल्लिकार्जुन खर्गे, मात्र, आमचा मूळ निर्णय आणि जनतेचा निर्णय हा आम्ही विरोधात बसण्याचा... सध्याची परिस्थिती तर हीच तसेच दिल्लीत सोनिया गांधीच्या निवासस्थानी 10 वाजता काँग्रेस पक्षाची बैठक
  • 07.42 AM - शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत राजीनामा दिल्यानंतर सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद
Last Updated : Nov 11, 2019, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details