महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या जामीनावर 24 नोव्हेंबलला मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबलला मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. कुर्ल्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली होती. दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

nawab malik
nawab malik

By

Published : Nov 14, 2022, 6:16 PM IST

Updated : Nov 14, 2022, 9:28 PM IST

मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबलला मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. कुर्ल्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली होती. दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळणार का जेलमधील मुक्काम वाढणार हे त्यावेळीच स्पष्ट होणार. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारककडून जमीन विकत घेतल्याचा आरोप आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत -नवाब मलिक यांना जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाच्या आदेशावरून मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात किडनीवर उपचार सुरू आहेत. नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणात जामीन मिळावे याकरिता अर्ज केला होता. या अर्जाला सुनावणी दरम्यान ईडीच्यावतीने विरोध करण्यात आला आहे.

नबाब मलिक यांच्यावतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना ईडीने करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच नवाब मलिक यांनी खरेदी केलेली जमीन ही माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेल्या कागदपत्राच्या आधारे तसेच पावर ऑफ अटरने रजिस्टर कार्यालयामध्ये करण्यात आली होती असे देखील देसाई यांनी युक्तीवादादरम्यान म्हटले होते. तसेच ईडीने करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असून जमीन खरेदी ही पी एम एल ए कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची खरेदी केलेली आहे. त्यामुळे नवामलिक यांच्या या प्रकरणात मनी लॉन्ड्रीग कलम लागू होत नाही असे देखील देसाई यांनी म्हटले होते.

नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप? -नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे

Last Updated : Nov 14, 2022, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details