मुंबई - शहरात झालेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपींपैकी एक असलेला अबू बकर याला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या फिटोज नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांकडून दुबई येथे करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दूबईतून अटक - Abu Bakar
अबू बकर हा दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक आहे. बॉम्ब ब्लास्ट आधी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात असल्याचे बोलले जाते.
मुंबई ब्लास्ट
या दोघांना प्रत्यार्पणानंतर भारतात आणले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा खास हस्तक आहे. बॉम्बस्फोटापूर्वी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात असल्याचे बोलले जाते. अबू बकर गेल्या अनेक वर्षांपासून यूएईत वास्तव्यास होता.
Last Updated : Feb 14, 2019, 11:44 AM IST