मुंबई- राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबईत मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळपासूनच मुख्य निवडणूक कार्यालयात लगबग दिसून आली.
रणधुमाळी लोकसभेची : मतदानासाठी मुंबई सज्ज, ४० हजार पोलिसांसह पॅरामिलिटरी तैनात
राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबईत मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चाळीस हजारपेक्षा जास्त कर्मचाऱंयाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संवेदनशिल केंद्रावर पॅरामिलिटरी फोर्सही तैनात करण्यात आली आहे.