मुंबई:हिवाळा आणि ख्रिसमस 2022 मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी, पनवेल ते पुणे- करमाळी दरम्यान विशेष भाडे आकारून 36 साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. Christmas Special Train जेणेकरून प्रवाश्याना त्रास होणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी द्वि- साप्ताहिक विशेष १६ गाड्या चालवल्या जाणार आहेत.
द्वि- साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2023 पर्यंत 8 सेवा दिल्या जातील. 36 Christmas special trains या ट्रेन सोमवार आणि बुधवारी 20.45 वाजता सुटेल, आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01460 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यन्त सेवा देतील. दरम्यान दर मंगळवार आणि गुरुवारी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ह्या ट्रेनचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम. ट्रेनच्या डब्याची रचना एक फर्स्ट एसी, तीन एसी-2 टियर, 15 एसी-3 टियर आणि दोन जनरेटर व्हॅन या स्वरूपाची असणार आहे.
पनवेल- करमाळी साप्ताहिकविशेष गाडी:१० फेऱ्या चालवल्या जातील. गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष पनवेल 17 डिसेंम्बर 2022 ते 14 जानेवारी 2023 पाच सेवा दिल्या जातील. दर शनिवारी ही ट्रेन 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष गाडी 17 डिसेंम्बर 2022 ते 14 जानेवारी 2023 दर शनिवारी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी 20.15 वाजता पनवेलला पोहोचेल.