महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईची 'लाईफलाईन' बंद; पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प - मेगा ब्लॉक

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

मुंबई

By

Published : Aug 4, 2019, 10:39 AM IST

मुंबई - शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल देखील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आज रविवार असला तरीही नेहमी सारखा मेगा ब्लॉक न ठेवता रेल्वे प्रशासनाने सेवा सुरू ठेवली. परंतु, पावसामुळे रुळांवर पाणी साचले असल्याने तिन्ही मार्ग आता ठप्प झाले आहेत.

शनिवारपासून शहरात आणि राज्यभरात सुरु असणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली आहे. आज रविवार असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी आहे. पण, कामानिमित्त बाहेर निघणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details