मुंबई - राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर आगमन झाल्यापासून ते 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी 'हयात हॉटेल'ला पोहचेपर्यंत मुंबई काँग्रेसनं स्वागत करावं, त्यासाठी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहावं, असं मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सांगण्यात आलंय. मात्र, 1 सप्टेंबरला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सत्कार समारंभात या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचं म्हणणं आहे. (Mumbai Congress Vs Maharashtra Congress) (INDIA Mumbai Meeting) (Rahul Gandhi Mumbai Visit)
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दोन्ही समित्यांमध्ये चढाओढ - राहुल गांधी यांचा सत्कार कार्यक्रम मुंबई काँग्रेसला म्हणजे राजीव गांधी भवन इथं घ्यावा असा मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला प्रस्ताव काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी धुडकावून लावला. तर हा कार्यक्रम मुंबई काँग्रेस आणि राज्य काँग्रेस यांचा संयुक्त आहे, पण केवळ मुंबई कार्यालयात जागा नसल्यानं आम्ही सत्कार टिळक भवन इथं घेत आहोत, असं मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, तर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. राहुल गांधी यांना 15 दिवस आधी आम्ही पत्र पाठवलंय. मुंबई महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र मुंबईत नाही त्यामुळं हा सत्कार टिळक भवन इथंच होईल, असं प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
काँग्रेस कार्यकर्ते नाराज - टिळक भवनात होणाऱ्या सत्कार कार्यक्रमासाठी मर्यादित पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्यानं सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली. टिळक भवनाऐवजी इतर भव्य सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
दोन काँग्रेस कमिटी आमनेसामने - येत्या ३१ ऑगस्ट आणि १ स्पटेंबर रोजी 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईतील पश्चिम उपनगरातील 'हयात' या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी सध्या महाविकास आघाडीकडून सुरूये. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेसचे अनेक बडे नेते मुंबईत दाखल होणार असल्यानं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा एक भव्य सत्कार सोहळा १ सप्टेंबरला दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात आयोजित करण्यात येणार आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच सामान्य कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडलीये. मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्या वादात सामान्य कार्यकर्ता भरडला जात आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीयं.
काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात - राजीव गांधी भवनमध्ये सत्कार आयोजित करायचा नसेल तरी टिळक भवनाऐवजी मुंबईतील इतर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना हजेरी लावता येऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकासाठी उत्साह संचारेल आणि तो महत्वाचा ठरेलं, असं मुंबई काँग्रेसचं म्हणणं आहे. मात्र, आता त्टिळक भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीच अडचण झाली आहे.
हेही वाचा -
- Nana Patole : काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार? नाना पटोले म्हणाले, आमचा पक्ष...
- 'INDIA' Meeting Mumbai : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीत लोगो होणार लॉन्च?
- Nana Patole On Onion Price : कांद्यावरून राजकारण तापले; शेतकऱ्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही - नाना पटोले