महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Ranas Claims Rejected: हनुमान चालीसा पठण प्रकरणात नवनीत राणा यांचे आरोप पोलिसांनी आज न्यायालयात फेटाळले - हनुमान चालिसा पठण वाद

हनुमान चालीसा प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोष मुक्तीसाठी केलेल्या अर्जावर आज सत्र न्यायालय मध्ये सुनावणी झाली. यावेळी मुंबई पोलिसांनी लेखी उत्तर सादर करून राणा दाम्पत्याच्या अर्जाला तीव्र विरोध केला. दोषमुक्ततेच्या याचिकेत राणा दांपत्याकडून केले गेलेले सर्व दावे पोलिसांनी सत्र न्यायालयात फेटाळून लावले.

Navneet Ranas Claims Rejected
नवनीत राणा यांचे आरोप फेटाळला

By

Published : Apr 3, 2023, 10:26 PM IST

मुंबई: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घराबाहेर शक्तीने हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दांपत्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आग्रह धरला होता. त्याला मुंबई पोलिसांनी मनाई केली होती. त्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या तपासात अर्थात सरकारी कामकाजात अडथळा आणला होता. म्हणून राणा दांपत्य यांच्याविरोधात सीआरपीसी संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.



एफआयआर खोट्या माहितीवर आधारित ? राणा दाम्पत्याच्या वतीने याबाबत त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे आणि दोषारोप हे खोटे असल्याचा दावा करणारी याचिका फेब्रुवारीमध्ये मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केली होती. त्या दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. राणा दांपत्याकडून त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर अधोरेखित केले की, पोलिसांनी त्यावेळेला नोंदवलेला एफआयआर ही खोट्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळेच तो गुन्हा कसा होऊ शकतो? सबब त्याच्या आधारावर केलेले दोषारोप पत्र देखील खोटे आहेत, असा दावा राणा दांपत्याच्या वतीने त्या याचिकेमध्ये करण्यात आलेला होता.

पोलिसांनी फेटाळला दावा:सरकारी अर्थात पोलिसांच्या बाजूने दावा मांडणारे अधिवक्ता सुरेश पांजवाणी यांनी न्यायालयासमोर ही बाब मांडले की, राणा दांपत्य यांनी ज्या रीतीने तेव्हा अस्तित्वात असलेले नियमांचा भंग केलेला आहे. अर्थात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 चा त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. राणा दांपत्य यांचा आरोप हा अमान्य आहे. त्याचे कारण सरकारी कामकाजात अडथळा आणला ही प्रत्यक्ष घडलेली घटना पाहता त्या अनुषंगानेच फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत होण्याची नोंद झालेली आहे. यासंदर्भात तपासाधिकारी पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी न्यायालयासमोर निवेदनात प्रतिज्ञापत्राद्वारे ही बाब आज मांडली.


पुढील सुनावणी 28 एप्रिलला: बोगस जात प्रमाणपत्र या प्रकरणाच्या संदर्भात दोषारोपातून मुक्तता मिळावी हा देखील अर्ज आधी राणा यांच्याकडून केला गेला होता. आता मुंबईतील हनुमान चालीसा पठण प्रकरणांमधून देखील दोषारोप मुक्तता मिळावी. अशा प्रकारचा अर्ज त्यांनी आज दाखल केला होता. मात्र त्यातील सर्व दावे पोलिसांकडून न्यायालयात फेटाळले गेले. त्यामुळे राणा दांपत्य यांच्या अर्जावर सत्र न्यायालय काय निर्णय देते ते पुढील सुनावणी मध्ये समजेल. पुढील सुनावणी 28 एप्रिल 2023 रोजी होईल.

हेही वाचा:Mumbai Crime : मुंबईतील बलात्कार प्रकरणाचे आसाम कनेक्शन; 5 वर्षापासून फरार आरोपीला अखेर अटक

ABOUT THE AUTHOR

...view details