महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Police Death : दोन दिवसाआड होते एका पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर - आजार आणि मृत्युसंख्या

मुंबई पोलीस दलातील पोलिसांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्था राखताना तसेच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलिसांवर येणारा ताण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईत 821 पोलिसांचे मृत्यू झाले आहेत.

Mumbai Police Death
पोलिसाचा मृत्यू

By

Published : May 24, 2023, 10:22 PM IST

Updated : May 24, 2023, 10:58 PM IST

मुंबई :मायानगरी मुंबई दहशतवाद्यांच्या कायम टार्गेटवर असते. हेच मुंबई पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक असते. मुंबईत सुरक्षा अबाधित ठेवणे, गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, कायदा सुव्यवस्था राखणे, वाहतुकीचे नियम, दहशतवादी अथवा इतर संशयास्पद हालचालीवर नजर अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलिसांवर येणारा ताण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईत 821 पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. या आकडेवारीवरून दर दोन दिवसांआड एक पोलिस दगावला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.



पोलिसांवर मोठा ताण: मुंबई नेहमीच गजबजलेली असते. राज्याच्या राजकीय घडामोडीचे केंद्रस्थान आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची कायम ये-जा सुरू असते. राजकीय सभा, मेळावे आणि महत्वाचे कार्यक्रम मुंबईत होत असतात. त्यामुळे त्या कार्यक्रमांना लागणारा बंदोबस्त हा पोलिसांनाच पुरवावा लागतो. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण तणाव हा नेहमीच असतो. नेते मंडळी आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती यांच्या भेटीगाठी यासाठी बंदोबस्त तसेच त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मुंबईत सर्व धर्माचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या कालावधीत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. आठ तास ड्यूटी करण्याचे आदेश आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हक्क्याच्या सुट्ट्या देखील पोलीसांना कधी कधी मिळत नाहीत.

गेल्या पाच वर्षांत मुंबईत 821 पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. तर दर दोन दिवसांआड एक पोलिसाचा होतो मृत्यू 2018 ते 2023 या पाच वर्षे आणि चार महिन्यांच्या कालावधीत 821 पोलिसांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू - माहिती अधिकार विभाग

सात पोलीसांचा ऑन ड्युटी मृत्यू:मार्च आणि एप्रिल हे दोन महिने उन्हाचे चटके बसत असून त्याचा परिणाम पोलीस दलावर झाला आहे. पोलिसाच्या मृत्यूचे प्रमाण हे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात अधिकच आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत 43 पोलिसांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. तर धक्कादायक बाब अशी की, सात पोलीसांचा ऑन ड्युटी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत पोलिसांचे मृत्यू

31 पोलिसांनी केली आत्महत्या: 5 वर्षांच्या कालावधीत 31 पोलिसांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागे घरगुती कारणे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर काही पोलिसांनी आजाराला कंटाळून आयुष्य संपविले आहे. यामध्ये कर्करोग, कोरोना यासारख्या आजारांचा समावेश आहे. गळफास लावून, इमारतीवरून उडी मारून, स्वतः च्या बंदुकीने गोळी मारून, रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच्या या घटना आहेत.

मृत्यू होण्याची कारणे



पोलिसांच्या मृत्यूची आकडेवारी: 2018 मध्ये 129 पोलिसांच्या मृत्यू झाला. 2019 - 143, 2020 - 230, 2021 - 160, 2022 - 115, तर 2023 मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान 43 पोलिसांच्या मृत्यू झाला आहे.




पोलिसांच्या मृत्यूची कारणे : पोलिसांचे वेळी अवेळी खाणे, वेळेवर जेवण न घेणे, ड्युटीचे अनियमित तास असल्यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांनी पोलिसांना ग्रासले आहे. तर सर्वाधिक 168 मृत्यू हृदयविकारासंबंधी वेगवेगळ्या आजारांमुळे झाले आहेत. त्यातच करोनाने मुंबई पोलिस दलातील 123 जणांचा नाहक बळी घेतला आहे. तसेच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, हृदयविकार हेही कारण आहे. त्याचबरोबर पोलीस आरोग्याची नियमित तपासणी करत नाही. तसेच बहुतांश पोलिस ठाण्यांत व्यायामशाळा आहेत, मात्र प्रतिसाद अत्यल्प आहे. कामाच्या ताणामुळे वेळ मिळत नसल्याचे कारण जास्त सांगितले जाते.

एकूण आकडेवारी



आजार आणि मृत्युसंख्या:हृदयविकाराने 168 मृत्यु झाले आहेत. तर कोरोनामुळे 123, कर्करोगामुळे 55, अपघातामुळे 45, आत्महत्येमुळे 31, क्षयरोगामुळे 22, तर यकृत / किडनी/ कावीळ यामुळे 77 आणि उच्च दाब आणि मधुमेह 46 तर इतर कारणामुळे 253 मृत्यु होतात. पोलिसांच्या आरोग्याचा मुद्दा नेहमीच सर्व स्तरावर दुर्लक्षित राहिला आहे. 2018 ते 2023 या पाच वर्षे आणि चार महिन्यांच्या कालावधीत 821 पोलिसांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले.

हेही वाचा -

  1. Bomb Blast Threat To Mumbai Police मुंबईत बॉम्बस्फोट करू मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकी
  2. Mumbai Police Recruitment Issue मुंबईतील त्या उमेदवारांचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले प्रशासनाचा गलथानपणा ठरला बाधक
  3. Encounter Specialist Daya Nayak दया नायकचा विषयच होता खोल या कारणामुळे आधी निलंबन अन् नंतर निर्दोष सुटका
Last Updated : May 24, 2023, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details