मुंबई- पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना गृह विभागाकडून ३ महिन्यांची बढती देण्यात आली आहे. ते येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता त्यांना बढती दिल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ३ महिन्यांची बढती, ३१ ऑगस्टला होणारे होते सेवानिवृत्त - mumbai police commissioner extension news
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे येत्या ३१ ऑगस्टला निवृत्त होणार होते. मात्र, आता त्यांना ३ महिन्यांची बढती देण्यात आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना बढती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का? -गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलिसांकडून मुंबई-गोवा महामार्गावर चोख बंदोबस्त
संजय बर्वे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी फक्त ६ महिने काम केले. त्यानंतर ३१ ऑगस्टला ते सेवानिवृत्त होणार होते. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग, डॉ. रश्मी शुक्ला तसेच डॉक्टर वेंकटेशन यांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यांना ३ महिन्यांची वाढीव बढती दिल्यामुळे सर्वांमध्ये नाराजी आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना बढती देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.