महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीचे मोबाईल कुरियरने परदेशात पाठवणारी टोळी गजाआड - mumbai police

शहरात गर्दीचे ठिकाणे असलेले रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार सारख्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण सर्रास वाढत चालले आहेत. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यातून मिळून प्रत्येक दिवशी जवळपास १५० हुन अधिक मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.

चोरीचे मोबाईल विदेशात कुरियरने पाठवणारी टोळी गजाआड

By

Published : Jul 15, 2019, 10:17 AM IST

मुंबई- येथील शहरात गर्दीचे ठिकाणे असलेले रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार सारख्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण सर्रास वाढत चालले आहेत. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यातून मिळून प्रत्येक दिवशी जवळपास १५० हुन अधिक मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मात्र हे चोरीला जाणारे मोबाइल चक्क नेपाळ व बांगलादेशात कुरियरच्या माध्यमातून विकणारी टोळी मुंबई पोलिसांनी पकडली आहे.


नेपाळ व बांगलादेश सारख्या देशात भारतात चोरलेल्या मोबाईल फोनला मोठी मागणी असल्याने याचे मोठे रॅकेट सध्या सक्रिय आहे. मुंबई शहरातून अशाच एका २० जणांच्या टोळीच्या मुसक्या विलेपार्ले पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी या संदर्भात तब्बल साडे आठ लाख रुपयांचे ५७ मोबाईल हस्तगत करीत जाहिद अहमद खान आणि मोहम्मद हसन शेख या दोन आरोपीना अटक केली आहे. मुंबईत चोरी होणारे मोबाईलला नेपाळ, बांगलादेश मधील एजंटला पाठविण्याचे काम ही टोळी करीत होती.

चोरीचे मोबाईल विदेशात कुरियरने पाठवणारी टोळी गजाआड


मुंबईत चोरी झालेले मोबाईल फोन अर्ध्या किमतीत नेपाळ व बांगलादेश सारख्या देशात विकले जातात. चोरीच्या मोबाईल फोनचे आयएमइआय नंबर नेपाळ, बांगलादेशमध्ये सहजपणे बदलले जातात. ज्यामुळे पोलिसांना हे मोबाईल फोन शोधणे कठीण होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या पूर्वीही शेकडो मोबाईल फोन कुरियन ने भारताबाहेर पाठवले होते. या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details