मुंबई- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 9ने एका हायप्रोफाइल हत्येच्या उधळून लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुमारे 60 लाख रुपयांची सुपारी देवून वहिनी आणि तिच्या बहिणीच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे.
लंडनमधील व्यक्तीला देण्यात आली होती 60 लाखांची सुपारी
मुंबईतील कुप्रसिद्ध मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहिणीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत यानेच दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विनोद भगतने लंडन येथील एका व्यक्तीला सुमारे 60 लाख रुपयांची सुपारी देऊन दोघींची हत्या करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भावाच्या हत्येच्या बदल्यासाठी दिली गेली सुपारी
मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहीण आशा भट्ट जामिनावर तुरुंगाबाहेर होत्या. या दोघींवर सुरेश भगत याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्याने वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. विनोद भगतने लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती.