महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार - mumbai muncipal

मुंबई महानगरपालिकेचा देवनार हा एकमेव कत्तलखाना आहे. देवनार परिसरातील ६४ एकर जागेत हा कत्तलखाना मुंबई महानगरपालिकेने १९७१ मध्ये बांधला आहे.

देवनार कत्तलखाना

By

Published : Mar 23, 2019, 8:45 AM IST

मुंबई- महानगरपालिकेने देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देवनार कत्तलखान्याचे रूप बदलणार आहे. या ठिकाणी आता आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कत्तलखान्याकरिता नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. आकर्षक प्रवेशद्वार, प्राण्यांसाठी नवीन निवारा केंद्र, संपूर्ण कत्तलखान्याच्या भोवती संरक्षक भिंतीचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे, यामुळे आता मुंबईत विनापरवाना प्राण्यांच्या कत्तलीवर आळा बसणार आहे.

देवनार कत्तलखाना

मुंबई महानगरपालिकेचा देवनार हा एकमेव कत्तलखाना आहे. देवनार परिसरातील ६४ एकर जागेत हा कत्तलखाना मुंबई महानगरपालिकेने १९७१ मध्ये बांधला आहे. येथूनच मुंबई शहर आणि उपनगरातील शहरांना मांस पुरवठा केला जातो. यातून मुबंई महानगरपालिकेला चांगला महसूल मिळतो. कत्तलखान्यातील असुविधांमुळे गेल्या काही वर्षांपासून व्यापारी व ग्राहकांना देखील मोठा प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्रास होत होता. तो आता कमी होणार आहे. सखल भागात भराव टाकून जमीन समतल करण्यात येणार आहे.

इमारत आणि सुविधांबाबत महानगरपालिकेकडे मोठया प्रमाणात तक्रारी येत होत्या. आता महानगरपालिकने कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ४७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २४ एकर खुल्या क्षेत्रावर कत्तलखान्यासाठी नवीन इमारत उभी करण्यात येणार आहे. यामध्ये शितपेट्या, हाडापासून मांस वेगळे करण्याचे यंत्र बसवले जाणार आहे. जनावरांच्या कत्तलीनंतर होणारा कचरा व घाण नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बसवण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details