महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुड न्यूज..! सात महिन्यानंतर धावणार मेट्रो, राज्य सरकारने दिली परवानगी

राज्य सरकारने अखेर मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमओपीएल) कामाला लागले आहे.

मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो

By

Published : Oct 14, 2020, 5:39 PM IST

Updated : Oct 14, 2020, 8:57 PM IST

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्ग 22 मार्चपासून बंद आहे. पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक सेवा-व्यवहार सुरू झाले आहेत. पण मेट्रो काही रुळावर येताना दिसत नव्हती. त्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत होती. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कारण राज्य सरकारने अखेर मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमओपीएल) कामाला लागले आहे.

सरकारच्या आदेशानुसार उद्या मेट्रो सुरू करता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पण यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने उद्या नाही पण येत्या दोन-तीन दिवसांत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तब्बल 7 महिन्यानंतर मुंबईत मेट्रो धावणार असून हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

अनलॉकमध्ये लोकल सेवा सुरू झाली आहे. पण सर्वसामान्यासाठी लोकलची सेवा उपलब्ध नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांच्यासाठी लोकल सेवा उपलब्ध आहे. पण आता मात्र मेट्रो 1 सेवा सुरू होणार असून मेट्रो मधून तरी सर्वसामान्यांना प्रवास करता येतो का हे ही लवकरच समजेल. मात्र आता मेट्रो सुरू झाल्यास वर्सोवा-घाटकोपर दरम्यान प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. तर मेट्रो सेवा कधी सुरू होईल हे आज उशिरापर्यंत एमएमओपीएलकडून जाहीर करण्यात येणार आहे.

Last Updated : Oct 14, 2020, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details