मुंबई -पाच महिन्यांहून अधिक काळापासून मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 बंद आहे. केंद्र सरकारने अनलॉक 4 मध्ये 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील सेवेत दाखल असलेली एकमेव मेट्रो 1 कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार आणि डीएमआरसी अर्थात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ग्रीन सिग्नल दिल्याबरोबर मेट्रो ट्रॅकवर येईल, अशी माहिती आता मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल) कडून देण्यात येत आहे.
11.5 किमीच्या मेट्रो 1 मधून दररोज साडे चार लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे साहजिकच मेट्रो 1 ला मुंबईकरांची पसंती असते. कोरोना काळात मेट्रोमध्ये सर्व नियमांचे पालन होणार आहे. यामुळे गर्दी टाळता येणार असल्याने, केवळ 50 टक्केच प्रवासी मेट्रोतून प्रवास करू शकतील. मुंबईकर मेट्रो प्रवासाला प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो 1 कधी सुरू होणार याकडे मेट्रो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
राज्य सरकार आणि डीएमआरसीच्या परवानगीनंतरच मेट्रो 1 ट्रॅकवर; एमएमओपीएलची माहिती - मेट्रो 1 ला राज्य सरकारच्या परवानगीची परीक्षा
केंद्र सरकारने अनलॉक 4 मध्ये मेट्रो सेवा 7 सप्टेंबर पासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील मेट्रो 1 सेवा राज्य सरकार आणि डीएमआरसीकडून परवानगी मिळाल्यानंतरच धावणार आहे. कोरोनामुळे केवळ 50 टक्के प्रवासीच मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत.
हेही वाचा-'आरे कारशेड हलविण्याची भूमिका केवळ अहंकारासाठी'
केंद्र सरकारने 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एमएमओपीएल मात्र आधीपासूनच मेट्रो 1 सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सज्ज आहे. मेट्रो स्थानक आणि मेट्रो गाड्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मेट्रो गाडीत आता केवळ 50 टक्के प्रवाशांना प्रवास करता येणार असून एक सीट सोडून प्रवाशांना आता बसावे लागणार आहे. टोकन पध्दत बंद करण्यात आली असून आता ई तिकिटांवर भर असणार आहे. अनेक नवीन बदल आता मेट्रोमध्ये दिसणार आहेत. केंद्राने मेट्रो सुरु करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र, राज्य सरकार आणि डीएमआरसीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच मेट्रो 1 पुन्हा धावायला लागणार आहे.