महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मातोश्री'ला शिवसैनिकांचं अभेद्य कवच - किशोरी पेडणेकर - shivsena chief residence matoshri

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवण्याची धमकी मिळाली आहे. दुबईवरून दाऊदच्या हस्तकाने फोन करत ही धमकी दिली.

kishori pednekar
किशोरी पेडणेकर

By

Published : Sep 6, 2020, 5:34 PM IST

Updated : Sep 6, 2020, 5:56 PM IST

मुंबई -मातोश्री धमकी प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 'कोणीही ऐऱ्या गैऱ्या-नथ्यू खैऱ्याच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मातोश्रीला तमाम शिवसैनिकांचे अभेद्य कवच आहे. मातोश्रीला प्रबोधनकार, बाळासाहेब आणि माँसाहेब यांची पुण्याई लाभली आहे. त्यामुळे आम्ही अशा पोकळ धमक्यांना भीत नाही.

किशोरी पेडणेकर, महापौर

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवण्याची धमकी मिळाली आहे. दुबईवरून दाऊदच्या हस्तकाने फोन करत ही धमकी दिली. याबाबत मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार कॉल्स आल्याची माहिती आहे. यानंतर मातोश्रीवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. याबाबत, ज्यांनी धमकी दिली आहे त्याची चौकशी होईल. आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्ण भरोसा आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा -दाऊद इब्राहिमकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी..

Last Updated : Sep 6, 2020, 5:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details