महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्याच्या 'वर्षा' बंगल्याच्या थकीत पाणी बिलावरून महापौर आणि जल विभागात ताळमेळ नसल्याचे उघड

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्याचे 24 लाख रुपये पाणी बिल थकीत असल्याचे समोर आले होते. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही थकबाकी असल्याचे मान्य करत ती लवकरच वसुल केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पालिकेच्या जल विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची कोणतीही थकबाकी नसल्याचे म्हटले आहे.

mumbai mayor kishori pednekar on cm varsha bungalow water bill
मुख्यमंत्र्याच्या 'वर्षा' बंगल्याच्या थकीत पाणी बिलावरून महापौर आणि जल विभागात ताळमेळ नसल्याचे उघड

By

Published : Dec 15, 2020, 12:13 AM IST

Updated : Dec 15, 2020, 12:42 AM IST

मुंबई - मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्याचे 24 लाख रुपये पाणी बिल थकीत असल्याचे समोर आले होते. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही थकबाकी असल्याचे मान्य करत ती लवकरच वसुल केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पालिकेच्या जल विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची कोणतीही थकबाकी नसल्याचा अहवाल दिल्याचे म्हटले आहे. यामुळे पालिका प्रशासन आणि पालिकेच्या प्रमुख असलेल्या महापौरांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर बोलताना...

थकबाकी वसूल करावी -
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा, मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तोरणा या बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या बंगल्याची 24 लाख रुपयांची पाणी बिले भरली नसल्याने मुंबई महापालिकेने थकबाकीदार म्हणून घोषित केली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना, 2017 मध्येही तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या निवसस्थानाचे पाणी बिल थकीत होते. त्यावेळी पालिका पाणी पुरवठा खंडित करायला गेली होती. त्यावेळी एक आठवड्याचा वेळ मागण्यात आला. त्यानंतरही थकबाकी भरण्यात आली नव्हती. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब आहे. अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यासाठी निधी खर्च होणार आहे. कोरोनाच्या काळात पालिकेचा महसूल कमी झाला असल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कार्यालये, निवासस्थाने यांच्याकडे असलेली थकबाकी वसूल करण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री पाणी बिलांची थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

थकबाकी नाही - मुख्यमंत्री कार्यालय
तर शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.

या मंत्र्यांची थकबाकी -
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे. या माहितीत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 थकबाकी आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा), वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राउत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाला थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट), राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहचे नावे आहेत.

हेही वाचा -'आयएनएस विराट टिकवण्यासाठी एनओसी मंजूर करायला त्वरित हस्तक्षेप करावा'

हेही वाचा -कंगना-हृतिक वादाचा तपास सीआययुकडे; जाणून घ्या प्रकरण

Last Updated : Dec 15, 2020, 12:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details