महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या महापौर अन् उपमहापौरांना मिळणार नवे दालन - मुंबई महापालिका

महापालिका मुख्यालयात नव्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. या कार्यालयांना जुन्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकामुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Mar 4, 2020, 10:17 AM IST

मुंबई- जागतिक दर्जाची महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना त्यांच्या पदाला साजेशी दालने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त कार्यालयाच्या मजल्यावरच ही दालने बनवण्यात येणार आहे. यामुळे पालिकेचा सर्व कारभार मुख्यालयाच्या जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरून हाकला जाणार आहे.

मुंबईच्या महापौर अन् उपमहापौरांना मिळणार नवे दालन

मुंबई महापालिकेचे मुख्यालय इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेले आहे. मुख्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या इमारतीच्या यादीत समावेश आहे. या इमारतीचे सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात. अशा या ऐतिहासीक इमारतीमध्ये मुंबईच्या महापौर, उपमहापौर, पालिका आयुक्त तसेच विविध समितीच्या अध्यक्षांची दालने आहेत. या इमारतीत पहिल्या मजल्यावर महापौरांचे तर दुसऱ्या मजल्यावर उपमहापौरांचे कार्यालय आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनांपेक्षा दुसऱ्या मजल्यावर पालिका आयुक्तांचेही प्रशस्थ दालन आहे. यामुळे महापौर आणि उपमहापौर यांनाही प्रशस्थ दालने देण्याची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने महापौर आणि पालिका आयुक्तांनी नव्या इमारतीमधील पक्ष कार्यालयांना भेटी दिल्या. त्यावेळी महापौर आणि उपमहापौरांना जुन्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर दालन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भू-संपादन अधिकारी बसत असलेली जागा महापौर आणि उपमहापौरांना दिली जाणार आहे. तसेच दोघांच्या दालनादरम्यान बैठकीसाठी सभागृह ठेवले जाणार आहे.

पक्ष कार्यालये जुन्या इमारतीमध्ये

महापालिका मुख्यालयात नव्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. या कार्यालयांना जुन्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली आहे. नवीन कार्यालये तयार असली तरी पक्ष कार्यालये नव्या जागेत हलवली जात नव्हती. महापौर आणि आयुक्तांच्या पाहणी दरम्यान पक्ष कार्यालये जुन्या इमारतीमध्ये लवकर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योग्य 'दिशा', ..महिला पोलिसांच्या संख्येत करणार वाढ'

ABOUT THE AUTHOR

...view details