महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल - local

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर बोरिवली ते अंधेरीदरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशिदरम्यान अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

लोकल

By

Published : Feb 17, 2019, 11:00 AM IST

मुंबई - आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्रहेड वायरच्या दुरुस्तीसाठी या तिन्ही मार्गावर सकाळी ११ वाजून १० मि. ते दुपारी ३ वाजून ४० मिनीटापर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर बोरिवली ते अंधेरीदरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशिदरम्यान अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हुसेनसागर एक्स्प्रेस गाडीचं इंजिन अंबरनाथ-बदलापूरमध्ये बंद पडल्यामुळे त्या मार्गावरील सर्व एक्स्प्रेस गाड्या खोळबंल्या आहेत. परिणामी कर्जतवरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे पाऊण ते एक तास उशीरा असल्याची माहिती मिळते आहे. शिवाय सोलापूरहून येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पनवेल-कर्जतमार्गे वळवण्यात आली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details