मुंबई- शहरात शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईची लोकल सेवा ठप्प, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
मुंबई शहरात व ठाण्यात शुक्रवारी रात्री पासून पुन्हा पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्याचा लोकल रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
कुर्ला ते सायनच्या दरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले असल्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे. तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान रुळावर पाणी साचले आहे. तसेच चेंबूर ते टिळकनगर स्थानाकादरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रेल्वे रुळच्यावर पूल आहे. त्याचा स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळे दोन्ही मार्ग ठप्प झाले आहेत. प्रवासी मात्र चालत जवळच्या स्टेशनवर जाताना पाहायला मिळत आहेत.
कुर्ला स्थानकाच्या बाहेर पूर्व-पश्चिम बस थांब्यावर प्रवाशी बेस्ट बसने प्रवास करण्यासाठी साठी जात आहेत. बेस्ट बस सुद्धा पूर्णतः भरून जात आहे. तर रिक्षाचालक मात्र, यादरम्यान प्रवाशांची लूट करताना पाहायला मिळत आहेत.