मुंबई -चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. मुंबईमध्येदेखील आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध निर्णय घेत आहे. यामध्ये आज मंत्रिमंडळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ८ दिवस बंद करण्याचा निर्णय होण्याची चर्चा आहे. जर राज्य सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंदचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करतो, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट; गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटात रेल्वेने केली वाढ...