महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव ब्लास्ट : लष्करासाठी बैठकीत भाग घेतल्याचे सिद्ध करा - उच्च न्यायालय - मालेगाव ब्लास्ट प्रकरण आदेश

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यातर्फे उच्च न्यायालयात युक्तिवाद करत असताना सांगण्यात आले होते की, लष्करासाठी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी 26 जानेवारी 2008 ला मालेगाव ब्लास्ट संदर्भात झालेल्या बैठकीसाठी ते सहभागी झाले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यावर कर्नल प्रसाद पुरोहित यांना या बैठकीत सामील होण्यासाठी कुठल्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा तशा प्रकारचे आदेश दिले होते असा प्रश्न विचारला होता.

malegaon bomb blast
मालेगाव ब्लास्ट

By

Published : Feb 5, 2021, 3:41 PM IST

मुंबई-2008 मालेगाव ब्लास्टसंदर्भात अटक करण्यात आलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप काढून टाकण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या अगोदरच्या झालेल्या सुनावणीदरम्यान लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दावा केला होता की 26 जानेवारी 2008ला अभिनव भारत या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आपण लष्करासाठी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी गेलो होतो. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या दाव्यावर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने प्रसाद पुरोहित यांना त्यांना लष्कराने गुप्त माहिती गोळा करण्यासाठी पाठवले असल्याचं सिद्ध करावं म्हणून आदेश दिलेले आहेत.

गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी विना आदेश बैठकीत भाग-

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यातर्फे उच्च न्यायालयात युक्तिवाद करत असताना सांगण्यात आले होते की, लष्करासाठी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी 26 जानेवारी 2008ला मालेगाव ब्लास्ट संदर्भात झालेल्या बैठकीसाठी ते सहभागी झाले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यावर कर्नल प्रसाद पुरोहित यांना या बैठकीत सामील होण्यासाठी कुठल्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा तशा प्रकारचे आदेश दिले होते असा प्रश्न विचारला होता. मात्र, प्रसाद पुरोहित यांच्यातर्फे गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी स्वतःहून या बैठकीमध्ये भाग घेतला होता. या दरम्यान मिळालेली माहिती ही त्यांच्या वरिष्ठांना देण्यात येत होती. त्यामुळे वरिष्ठांच्या कुठलाही आदेशाशिवाय कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या बैठकीत भाग घेतला असल्याचा दावा करण्यात आला होता.

हेही वाचा -जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

मात्र, यावर न्यायालयाचे समाधान न झाल्यामुळे न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित यांना त्यांनी या बैठकीत भाग लष्कराला गुप्त माहिती देण्यासाठी घेतला म्हणून सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, 2008मध्ये मालेगाव येथे झालेल्या बसमध्ये 100 हून अधिक जण जखमी झाले होते. तर 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details