महाराष्ट्र

maharashtra

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना, लोको पायलटसोबत ईटीव्ही भारतने साधला संवाद

By

Published : Jun 27, 2023, 2:24 PM IST

Updated : Jun 27, 2023, 3:50 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राणी कमलापती (भोपाळ) रेल्वे स्थानकावरून मडगाव आणि मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी आता मडगाव स्थानकावरून रवाना झाली आहे. 8 तासांत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ती पोहोचणार आहे. ट्रेन आपला संपूर्ण प्रवास करताना सात स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन सुमारे 586 किलोमीटरचे अंतर आठ तासांत पूर्ण करेल. यावेळी लोको पायलटसोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.

Vande Bharat Express
वंदे भारत एक्स्प्रेस

वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई :पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दोन्ही राज्यांमधील संपर्क वाढेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमध्ये सर्वात मोठी क्रांती करत आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेस

देशाची खरी जीवनरेखा :2014 पूर्वीच्या बिगर-भाजप सरकारांशी तुलना केली तर, देशात अशी क्रांती कधीच झाली नाही. रस्ते, हवाई, रेल्वे आणि जल कनेक्टिव्हिटीची तुलना सध्याच्या आणि पूर्वीच्या सरकारांशीही करता येईल. आमच्या सरकारने एवढी प्रगती केली आहे की, त्याबद्दल सांगायला मला अर्धा तास लागेल. गोव्यासारख्या छोट्या राज्यात होणारे बदल आपण पाहू शकता. वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र आणि गोव्यातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी मदत करेल. रेल्वे ही आपल्या देशाची खरी जीवनरेखा आहे. जिथे सामान्य लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

वंदे भारत एक्स्प्रेस


इतका वेळ वाचणार :आता सध्याच्या गाड्यांना गोव्यातील मडगाव स्थानकापासून ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे सुमारे 586 किलोमिटर अंतर कापण्यासाठी साधारण 11 ते 12 तास इतका वेळ लागतो. तेच अंतर या ट्रेनने अवघ्या 8 तासात प्रवाशांना कापता येणार असल्याने प्रवाशांचा साधारण ३ ते ४ तासांचा वेळ वाचणार आहे. कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले आहे. या अंतर्गत सर्वच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. याशिवाय पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरडी कोसळण्याचा घटना सुरु असते. याशिवाय दृष्यमानताही कमी होते. अशा परिस्थितीत वंदे भारत या सेमी स्पीड रेल्वेगाडीलाही मर्यादा येणार आहे, असे लोकोपायलट अनिल कुमार कश्यप यांनी सांगितले आहे. अंदाचित तिकीट दर चेअर कार १५८० रुपये, एक्झिक्युटीव चेअर कार २८७० रुपये असा आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीपासुन सुरु होणार दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम मडगाव शेवटचा थांबा असणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस

हेही वाचा :

  1. Mumbai Goa Vande Bharat Express : मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील, उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत
  2. Vande Metro : वंदे भारत नंतर आता धावणार वंदे मेट्रो! जाणून घ्या सर्वकाही
  3. Vande Bharat Express: मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण काही तासांवर; रेल्वे कर्मचारी देत आहेत फायनल टच
Last Updated : Jun 27, 2023, 3:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details