मुंबई- मुंबई कस्टम विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या मुंबई -गोवा- मुंबई ही सागरी मार्गक्रमण मोहीम आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही मोहीम ८ जणांच्या चमूने पूर्ण केली. या सागरी मोहिमेचे नेतृत्व आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त केनिथ डिसुझा यांनी केले.
मुंबई -गोवा- मुंबई सागरी मार्गक्रमण मोहीम पूर्ण - अरबी समुद्र
सागरी मोहिमेचे नेतृत्व आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त केनिथ डिसुझा यांनी केले.
मुंबई -गोवा- मुंबई सागरी मार्गक्रमण मोहीम पूर्ण
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्ड विभागाकडून देशात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे, सागरी प्रदूषणाबद्दल जनजागृती करणे, स्वच्छ सागर स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करण्यासारखा उद्देश समोर ठेवून ही मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रसार हा होता. सहभागी 8 जनांच्या चमूचे स्वागत आज मुंबईत करण्यात आले.