मुंबई : मालाड मार्वे बीचवर पोहायला गेलेल्या 5 मुले समुद्रात बुडाल्याची घटना आज सकाळी 9 वाजता घडली आहे. ही 5 मुले मालाड मालवणी परिसरात राहणारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राचा खोलात गेल्यामुळे हे 5 मुले समुद्रात बुडाली आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळतच मालवणी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड आणि अग्निशामक दलाचे जवान समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहेत. दोघांना वाचविण्यात यश असून बेपत्ता असलेल्या तिघांचा समुद्रात शोध सुरू आहे. आज सकाळी 9 वाजता हे मुले घरातून मालाड मार्वे बीचवर पोहायला गेले होते.
अंघोळीसाठी समुद्रात उड्या मारल्या : मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरात हे मुले राहत होते. आज सकाळी हे मुले समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. या मुलांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाच मुले बुजू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधरणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली होती. दरम्यान यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले असून बचाव कार्य अद्याप सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वाचवण्यात आलेल्या मुलांचे नाव कृष्णा जितेंद्र हरिजन (16) आणि अंकुश भारत शिवरे वय 13 वर्ष असे आहे. याच्या बरोबर समुद्रात उड्या घेतलेल्या मुलाचे नावे समोर आली आहेत. शुभम राजकुमार जयस्वाल वय 12 वर्ष, निखील साजिद कायमकूर वयवर्ष 13, अजय जितेंद्र हरिजन वय वर्ष 12 अशी अद्याप बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत. कोस्ट गार्डचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, आणि महापालिकेचे जीव रक्षक या मुलांचा शोध घेत आहेत.