महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2019, 11:07 PM IST

ETV Bharat / state

भाजप-सेनेच्या 'या' मंत्र्यांना आघाडीने चारली धूळ, ही आहेत कारणे...

विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजप-शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. हा युती मोठा फटका मानला जात आहे. युतीच्या पराभूत नेत्यांमध्ये पंकजा मुंडे, राम शिंदे, विजय शिवतारे, परिणय फुके यांचा समावेश आहे.

भाजप-सेनेच्या 'या' मंत्र्यांना आघाडीने चारली धूळ, ही आहेत कारणे...

मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजप-शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. हा युती मोठा फटका मानला जात आहे. युतीच्या पराभूत नेत्यांमध्ये पंकजा मुंडे, राम शिंदे, विजय शिवतारे, परिणय फुके यांचा समावेश आहे.

हेही वाचा -आता बोलायची नाही काम करण्याची वेळ; आदित्य ठाकरेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रीया

1. पंकजा मुंडे - महाराष्ट्रातील चुरशीच्या लढतींपैकी ही एक लढत मानली जात होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे हे निवडणूक लढवत होते. या लढतीत धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धनंजय यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. पंकजा मुंडे आणि भाजप नेत्यांनी आरोप केला की, धनंजय यांनी पातळीसोडून टीका केली. त्यांच्याविरोधात मोर्चाही काढण्यात आला. मात्र, मतदारांनी त्याआधीत आपले मत पक्के केले होते की काय, असा निकाल परळीतून समोर आला. तसेच पंकजा यांचा जनसंपर्क कमी असल्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. पाच वर्षे मंत्री असूनही मतदारसंघात त्यांनी हवी तेवढी विकासकामे केली नाही, असेही त्यांच्याबद्दल बोलले जात होते. हेही त्यांच्या पराभवाची महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.

हेही वाचा -रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून गंगाखेडची निवडणूक जिंकली; परभणीत नवा इतिहास

2. राम शिंदे - भाजपचे उमेदवार राम शिंदे हे सध्याच्या मंत्रिमडळात जलसंधारण मंत्री आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढवत होते. जनसंपर्काचा अभाव आणि विकास कामांचा अभाव हे त्यांच्या पराभवाची कारणे आहेत.

3. जयदत्त क्षीरसागर - राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला आहे. जयदत्त यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे देखील त्यांच्यावर स्थानिक मतदार नाराज होते. आणि हेच त्यांच्या पराभवाचे महत्वाचे कारण ठरले.

हेही वाचा -मुख्यमंत्री कोण हे चर्चेनंतर ठरवणार - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

4. विजय शिवतारे - शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात पुरंदर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप हे निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात अजित पवार ‘शिवतारे कसा निवडून येतो, तेच बघतो’ असे म्हणाले होते. अखेर शिवतारे यांचा पराभव झाला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

5. परिणय फुके - राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचाही पराभव झाला आहे. ते साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांविरूद्ध काँग्रेसचे नाना पटोले निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांच्या पराभवाने शिवसेनेला धक्का बसला आहे.

हेही वाचा -सोलापूर जिल्हा : महायुती 5, आघाडी 4 तर अपक्ष 2 जागांवर विजयी

6. अर्जन खोतकर -शिवसेनेचे महत्त्वाचे मंत्री अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला आहे. जालन्यातून खोतकर यांना काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी पराभूत केले. खोतकर हे जालन्यातील मोठं प्रस्थ समजलं जातं. ते लोकसभेचे दावेदारही होते. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी वाद झाला होता. त्याचाच फटका खोतकर यांना बसल्याचं सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details