महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लालबाग गॅस सिलिंडर स्फोट : मृतांचा आकडा ८ वर - लालबाग गॅस दुर्घटना न्यूज

लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे.

Mumbai: Death toll in Lalbaug's cylinder blast-fire rises to 8
लालबाग गॅस सिलिंडर स्फोट : मृतांचा आकडा ८ वर

By

Published : Dec 17, 2020, 3:10 AM IST

मुंबई - लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे. या दुर्घटनेतील ५ जणांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सकाळच्या सुमारास जेवण बनवले जाणार होते. मात्र रात्रीपासून गॅस गळती झाल्याने गॅस पेटवताच सिलेंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (वय ६२) आणि करीम (वय ४५) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.

मृत्यूंचा तपशील -
शुक्रवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मंगेश राणे (वय ६१), सकाळी ९.२५ वाजता ज्ञानदेव सावंत ( वय ८५) यांचा तर दुपारी १.३० वाजता महेश मुणगे (वय ५६) यांचा अशा तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली होती. १२ डिसेंबरला सायंकाळी ७.४५ वाजता विनायक शिंदे (वय ४७ वर्ष) यांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची आकडेवारी ६ वर पोहचली. १४ डिसेंबरला मध्यरात्री रोशन अंधारे व १५ डिसेंबरला मध्यरात्री सूर्यकांत अंबिके यांचा मृत्यू झाला. लालबाग दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातून तिघांना घरी सोडण्यात आले
दुर्घटना घडताच १२ जखमींना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांना मसिना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे मसिना रुग्णालयातील जखमींची संख्या सहा झाली. यातील एकाचा मंगळवारी मृत्यू झाला असून उर्वरीत पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मृतांची नावे
सुशीला बांगरे (वय ६२)
करीम (वय ४५)
मंगेश राणे (वय ६१)
ज्ञानदेव सावंत (वय ८५)
महेश मुणगे (वय ५६)
विनायक शिंदे (वय ५७)
रोशन अंधारे (वय ४०)
सूर्यकांत अंबिके (वय ६०)

ABOUT THE AUTHOR

...view details