मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता आता वाढली आहे. याचा फटका बळीराजाला बसत आहे. पाण्यासाठी वणवण आणि खायला अन्न नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. मुलींच्या लग्नाचा, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुलींच्या लग्नासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यात मुंबईचा डबेवाला यांच्या संस्थेचाही समावेश आहे. डबे पोहचवून मिळणाऱ्या पैशातून या डबेवाल्यांनी 25 हजाराची रक्कम या मुलींच्या लग्नासाठी जमा केली आहे. हा सामूहिक लग्न सोहळा उस्मानाबाद जिह्यातील इंदापूर येथे पार पडणार आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांनी पार पाडली मोठ्या भावाची भूमिका; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी केली मदत
महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. मुलांचे पालनपोषण व त्यांचा शिक्षणाचा खर्च, त्यात लग्नाच्या वयात आलेल्या मुली त्यांच्या लग्नाचा खर्च कसा उचलायचा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाले आहेत. त्यांना हातभार म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी 25 हजाराची मदत केली आहे. आणखी मदतीसाठीही ही संस्था प्रयत्न करत आहे.

आमची संस्था १३० वर्ष जुनी आहे. आम्ही दुष्काळग्रस्त लोकांसाठी मदत करणार आहोत. शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचा सामुदायिक विवाहसोहळा उस्मानाबाद जिल्ह्यातील इंदापूर या गावात २९ मे ला पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. 20 जोडपी यात भाग घेणार आहेत. त्यासाठी आम्ही 25 हजारांची मदत त्यांना केली आहे. आमच्याबरोबर 4 संघटनादेखील आहेत. आम्ही त्याठिकाणी गेलो असता तेथील काही मुलींची आम्ही व्यथा जाणून घेतली. त्यांची शिक्षणाची इच्छा आहे, परंतु त्यांना शिकता येत नाही. त्यांच्यासाठी सरकारने काही तरी करायला हवे. असे मुबंई डब्बेवाला अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले